"वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी", झाडे ही आपली खरे मित्र आहेत."
भारतातील जंगलाविषयी माहिती
भारत सरकारच्या वन व पर्यावरण विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार भारतातील 78 लाख 29 हजार चौ. हेक्टर जमिनक्षेत्र वनाखाली असून भारताच्या एकूण जमिनक्षेत्राच्या 23.81जमिनक्षेत्र जंगलाखालील आहे.भारतातील 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाचा विचार केल्यास काही राज्यामध्ये जंगलाचे प्रमाण कमी झाले असून काही राज्यामध्ये जंगलाचे प्रमाण वाढलेले आहे.
भारतातील जंगलाचे प्रमाण व राज्ये
आकारमानानुसार सर्वाधिक जंगल असलेले राज्य –
भारतात सर्वात जास्त जंगलाचे प्रमाण मध्यप्रदेश राज्यात (94,689 चौ.कि.मी.) असून दूसरा क्रमांक आंध्रप्रदेश (63,814 चौ.कि.मी.) राज्याचा आणि तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा (61,939 चौ.कि.मी.) लागतो.
सर्वात कमी जंगल नसलेले राज्य–
हरियाणा राज्यामध्ये सर्वात कमी जंगले असून हरियाणामधील फक्त 3.53% जमीन जंगलाखाली आहे. त्यानंतर अनुक्रमे पंजाब (6.12%) व बिहार (6.87%) जमीन जंगलाखाली आहे.
क्षेत्रफळानुसार जंगलाचे प्रमाण जास्त असलेले राज्य
क्षेत्रफळानुसार सर्वात जास्त जंगलाचे प्रमाण सिक्कीम (82.31%) राज्यात आहे. त्यानंतर अनुक्रमे दूसरा क्रमांक मिझोरम (79.30%) व तिसरा क्रमांक मणीपुर (78.01%) लागतो. केंद्रशासीत प्रदेशात सर्वाधिक जंगले लक्षव्दिप बेटामध्ये आहे.
भारतातील प्रमुख जिवारण्ये :
निलगिरी – तामीळनाडू, कर्नाटक व केरळ राज्यांमिळूननंदादेवी – उत्तराखंडमानस – आसामसुंदरबन – पश्चिम बंगालमन्यार खाडी – तामीळनाडूपंचमढी – मध्यप्रदेशकच्छ – गुजरातग्रेट निकोबार – अंदमान व निकोबर
जगण्यासाठी प्रत्येकाला पैसा नंतर, आधी प्राणवायू लागतो. हा प्राणवायू तयार करण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे आवश्यक आहे. ज्या वसुंधरेने मनुष्याचे पोषण केले, तो मनुष्य मात्र वसुंधरेचे शोषण करण्यात धन्यता मानत आहे. त्यासाठी पर्यावरणाचे अर्थशास्त्र समजून घेणे आवश्यक आहे.
एका माणसाला दररोज 2100 रुपयांचा प्राणवायू लागतो.
तो जर 80 वर्षे जगला,
तर त्याचे दिवस होतात 29200.
या पूर्ण आयुष्यात त्याने घेतलेल्या प्राणवायूचे बाजारमूल्य आहे
6 कोटी 13 लाख 20 हजार रुपये...
इतक्या बाजारमूल्याचा प्राणवायू प्रत्येक माणूस आपल्या पूर्ण आयुष्यात घेतो. त्यासाठी किमान प्रत्येकाने आपल्यापुरता प्राणवायू देणारा वृक्ष लावावा.
कारण आपल्याला वृक्ष तोडणाऱ्या हातांपेक्षा वृक्ष लावणाऱ्या हातांची संख्या वाढवायची आहे.
प्राण वायू हा हवेतील महत्त्वाचा घटक आहे. प्राणवायू विना माणूस पाच मिनीटे देखील जगणे शक्य नाही. हवेत ऑक्सिजनचे प्रमाण २१% असते.
विषारी अथवा अविषारी वायू केवळ आपल्या आस्तित्वाने हवेतील ऑक्सिजन कमी करतात. जिवंत रहाण्यासाठी आपल्याला सतत प्राणवायूचा योग्य त्या प्रमाणात पुरवठा व्हावा लागतो.
श्वसनक्रियेतून कार्बनडायऑक्साईड वायू बाहेर पडतो तसेच रात्रीच्या वेळी वनस्पती कार्बनडायऑक्साईड उत्सर्जीत करतात. दिवसा वनस्पती प्रकाश संश्लेषणाची क्रिया करतात, यावेळी हवेतील कार्बनवायू शोषूण घेतात व प्राणवायू सोडतात. अशा प्रकारे नैसर्गिक रीतीने हवेतील घटकांचे प्रमाण कायम राखले जाते.
पिंपळ १०० टक्के, वड ८० टक्के तर कडूलिंब ७५ टक्के कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात.
सयाजी शिंदे, सागर कारंडेकडून वृक्ष लागवड
IBN Lokmat Special Show Sahyadri, Sayaji shinde & Devrai by Mandar Phanse
10 लाखांवर वृक्षारोप करणारे आणि देवराईला जनमानसात पोहोचवणे सयाजी शिंदे यांच्यासोबत खास संवाद
सामाजिक संदेश श्री.सयाजी शिंदे सर यांच्याकडून.
एक झाड त्याच्या जीवनामध्ये १५ लाख रुपयांच्या किमतीचे ऑक्सिजनचे उत्पादन करते.
तसेच एक झाड १८ लाख रुपयांची जमिनीची धुप थांबवते.
एका झाडापासून एका कुटुंबापुरते फर्निचर बनविता येते.
एक झाड एका वर्षात तीन किलो कार्बनचा नाश करते.
एक झाड नेहमीच्या तापमानात २ अंशाने घट करते.
एक झाड ५० किलो पालापाचोळा मातीमध्ये नैसर्गिक पाने मिसळुन जमिनीचा कस सुधारतो.
एक झाड त्याच्या जीवनामध्ये जमिनीला ६.५० लाख रुपये किमतीचे पोषक मुळे पुरवते.
प्रत्येकाने एक तरी झाड लावावे ते जागवावे ,आणि वाचवावे तरच आपण भावी पीडी साठी आजच्या दराने २५ लाख रुपयाची मालमत्ता तयार करतो.
वाढदिवसाच्या दिवशी झाड लावणे.
भेटवस्तू म्हणून झाडाची रोपे देणे.
कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांना भेटवस्तू म्हणून झाडे देणे.
ओसाड जमिनीवर उपक्रम राबवून सामुदायिक वृक्षारोपण केले पाहिजे.
प्राणवायू देणाऱ्या वृक्षसंपत्तीच्या रक्षणाकरिता प्रयेकाने पावसाळ्यात एक तरी झाड लावण्याचा संकल्प करून तो अमलात आणला पाहिजे.
मोठ्या प्रमाणावर शालेय तसेच महाविद्यालयीन उपक्रमा अंतर्गत वृक्षारोपण केले पाहिजे.