.
'उदरभरण' नोहे जाणिजे 'यज्ञ' कर्म.
अस्वच्छ हात, वाहत्या पाण्यात साबणाने धुवा. वैयक्तिक स्वच्छता राखूया, निरोगी राहूया... !
भिंती थुंकून रंगवू नका, रंगवायच्याच असतील तर चित्राने रंगवा.
राष्ट्रध्वजाचा सन्मान, हीच राष्ट्रभक्तीची शान ! राष्ट्रध्वजाचा अवमान करू नका, करू देऊ नका !
आदरभाव हाच खरा मानव स्वभाव ! थोरा मोठ्यांना मदत करा, आदर करा !
शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल करा अन्नाची नासाडी टाळा.
जर झाडांना घालू पाणी, तरच राहील पर्यावरणाची निगराणी ! झाडे जगवा पृथ्वी वाचवा.
रुग्णवाहिकेला वाट करून द्या, रुग्णाचा जीव वाचविण्यास मदत करा.
सार्वजनिक संपत्तीची जपणूक ही आपली जबाबदारी आणि हेच खरे नागरिकत्व!.
हे गाव, शहर माझे आहे, येथील सार्वजनिक मालमत्ता हि माझी जबाबदारी आहे.
नियमित व्यायाम करा व संतुलित आहार घ्या. रोगप्रतिकारक शक्ती वाढवा. स्वतःची काळजी स्वतःच घ्या !
रंगपंचमी साजरी करतांना स्वतःबरोबर मुक्या प्राण्यांची काळजी घ्या. रासायनिक रंगा ऐवजी नैसर्गिक घटकांपासून बनवलेले रंग वापरा.
वाहतुकीचे नियम पाळा झेब्रा क्रॉसिंगच्या मागे उभे रहा !!
हस्तांदोलन नको, नमस्ते करा आरोग्याला सगळ्यांच्याच सांभाळा.
घाबरू नका पण काळजी घ्या, अफवांवर विश्वास ठेऊ नका अफवा पसरू नका.
लहान मुले सुद्धा कचरा कचरा पेटीतच टाकत आहे हि सवय तुम्हाला कधी लागणार रस्त्यात कचरा टाकू नका.
आपले सामाजिक वर्तन हीच खरी आपली संस्कृती विनम्रपणे वागा संस्कृती जपा.
अबाल, वृद्ध विद्यार्थी शांततेवर यांची प्रीती, कर्कश्य आवाज नको सभोवती, अंतर्मुख होता येई प्रचिती, शांतता पाळा, ध्वनीप्रदूषण टाळा.
सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक जाने टाळा. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या.
अन्न वाया घालवू नका, अन्नाचे मोल अनमोल आहे. अन्नाची नासाडी टाळा.
वेळेच्या नियोजनाइतकेच महत्वाचे आहे कचऱ्याचे नियोजन, ओला आणि सुका कचरा वेगळा करा.
सामाजिक जीवनातील क्रोध आवरा, तुमचे जीवन सुखकर करा.
पतंग उडवा मात्र पक्ष्याना इजा होणार याची काळजी घ्या. नायलॉन मांजा वापरू नका.
मी एक सुसंस्कृत नागरिक आहे, मी रांगेचे नियम पाळतो रांगेची शिस्त पाळा, सुसंस्कृतपणा सांभाळा.
रंगपंचमी साजरी करतांना सणाला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या पाण्याचा वापर कमी करा.
अत्यंत 'ज्वलंत' प्रश्न देखील शांतपणे चर्चेतून मार्ग काढूनच सोडवता येतात सामायिक संपत्ती जपूया, नुकसान टाळूया.
गाड्यांमधील काळा धूर, करी तुमच्या फुफ्फुसांना कमजोर! वायु प्रदूषण टाळा, पर्यावरण सांभाळा!
शुद्धता पाण्याची, आरोग्यता जीवनाची
पुढच्या पिढीला काचा फुटलेल्या रेल्वेपेक्षा सुरक्षित रेल्वे दाखवा.
ह्या पृथ्वीतालावर पाणी आहे तर जीवन आहे. नाहीतर सर्व निष्फळ आहे. पाणी वाचवा. जीवन वाचवा.
पर्यटकांची मदत करा, आपल्या शहराची संस्कृती जपा!
सहप्रवाशाचा मान राखा, स्वताचा सन्मान जपा.
सर्दी झाली आणि खोकला आला तर रुमाल वापरा. इतरांच्या आरोग्याची काळजी घ्या.
मायेची सावली देणाऱ्या वृक्षाची जोपासना करूया, हरित वसुंधरेची उपासना करूया! रोप लावूया, वृक्ष जगवूया!
नदी जगली तर आपण जगू, नदी-नाले वाचवा जैवविविधता सांभाळा!
मातीचा कस जपूया, मातीचे संवर्धन करूया. शेतीला नवजीवन देऊया.
चला सारे एकत्र येऊया. ग्लोबल वार्मिंग थांबवण्यात पुढाकार घेऊया.
जागतिक तापमान वाढ तेव्हाच थांबेल, जेव्हा प्रत्येकाच्या हातून किमान एक तरी झाड लागेल.
चला सगळे मिळून बदल घडवू या हे सगळे बदलायला हवं
धूम्रपान सोडा – सिगारेटचा धूर, नेई सर्वांपासून दूर.