माझे स्वप्नातील गाव

माझ्या स्वप्नातील समृद्ध गावाची सुरुवात पक्ष्यांच्या किलबिलाट व चिवचिवटाबरोबर तर कधी कोंबड्याच्या बांगेने व्हावी. गावाच्या बाजूला असलेले हिरवेगार डोंगर असावीत, जिथे सुट्टीच्या दिवशी मला फिरायला जायला आवडेल. गावातून शेतात जाण्यासाठी बैलगाडीची सैर करायला मनापासून आवडेल.तसेच गावच्या वनराईतील ऋतूनुसार मिळणाऱ्या रानमेव्याची म्हणजेच पेरू, आंबा, चिंच, बोर आणि जांभूळ यांची गोडी चाखायला आवडेल.

निंबाच्या किंवा आंब्याच्या झाडाला बांधलेल्या झोक्यावर उंच झोका घ्यायला आवडेल. गावातल्या नदीकाठी किंवा असणार्या तळ्याकाठी मासे, पानकोंबडी बघायला आवडेल. माझ्या स्वप्नातील गाव हे स्वच्छ, सुंदर व सौरउर्जेने युक्त असावे. भारतातले प्रत्येक गाव हे समृद्ध गाव असावे. तिथे लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वाना लागणाऱ्या सर्व जीवनावश्यक गोष्टी असाव्यात. जसे कि,-

Literate people

शासनाच्या योजना राबविण्यासाठी गाव १००% साक्षर असावे.

School

एक छानशी शाळा असावी.

Library

सार्वजनिक वाचनालय असावे.

Bus Stop

गावातील सर्वाना प्रवासासाठी बस स्टॉप ची सोय हवी.

Study Room

स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी अभ्यासिका असावी.

Water Tank

स्वच्छ पिण्याचे पाण्याची टाकी.

Road

मजबूत रस्ते असावे.

Save trees

रस्त्यांच्या कडेला दुतर्फा झाडे असावीत.

Playground

मुलांसाठी खेळायला उद्यान असावे.

Street Lamps

रस्त्यावरील पथदीप सौरऊर्जेवरील असावे.

Rights

प्रत्येक व्यक्तीस मुलभूत अधिकार व कर्तव्यांची माहिती असावी.

Weather information

हवामानातील माहितीसाठी स्वतंत्र विभाग असावा.

Hospital

संपूर्ण गावाच्या क्षमेतेनुसार परिपूर्ण असे आरोग्य केंद्र असावे.

Grass

गावाचे पशुपालनासाठी गवताचे कुरण असावे.

Jogging Park

जेष्ठ नागरिकांसाठी जॉगिग पार्क असावे.

Godown

धान्य साठवण्याचे अद्ययावत गोदाम असावे.

Handpump

पाण्यासाठी हातपंपाची पर्यायी व्यवस्था असावी.

Toilet

प्रत्येकाने घरगुती किंवा सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा.

Dust bin

कचरा व्यवस्थापनसाठी सार्वजनिक कचरकुंडी असावी.

Windmill

शक्य असल्यास गावात वायुऊर्जा असावी.

Electricity Supply

गावातील प्रत्येक घरात वीज पुरवठा व्हावा.

Computer literacy

जास्तीत जास्त नागरिक संगणक साक्षर असावे.

Save Electricity

वीज बचत करणारे विद्युत उपकरणांचा वापर व्हावा.

CCTV Camera

शक्य असल्यास गावात cctv असावा.

Avoid Plastic Bags

गावात plastic पिशवीचा वापर नसावा.

Supermarket

गावात मध्यवर्ती बाजारपेठ असावी.

Waterpipe

सांडपाणी वाहून नेण्यासाठी भूमिगत गटारे असावीत.

Celebration Hall

सार्वजनिक कार्यक्रमासाठी गावात सभामंडप असावा.

Gym

गावात खेळाडूंसाठी व्यायामशाळा असावी.

Public Toilet

गावात सार्वजनिक स्वच्छतागृह असावे.

Agriculture Help Center

शेती मदत केंद्र असावे.

Wifi

गावात इंटरनेटची सुविधा उपलब्ध असावी.

Disaster management

गावात आपत्ती व्यवस्थापन केंद्र असावे.

Icon made by Freepik from www.flaticon.com