पशु आहार

मारवेल - भारतातील सुपरिचित वन्य गवतांपैकी हे एक गवत आहे. मैदानी प्रदेशात व 910 मीटर उंचीपर्यंतच्या डोंगराळ भागात हे बहुवर्षायू गवत आढळते. द‘खनच्या पठारावर जवळजवळ सर्वत्र पवना गवताबरोबर मारवेल आढळते. उत्तर भारतात प्रकारच्या कुरणात ही सर्वात महत्त्वाची तृणजाती आहे; कुरणाचा विकास सर्वोच्च पातळीवर होतो तेव्हा मारवेल गवत त्यात प्रामु‘याने दिसते. कर्नाटकात बेल्लारी येथील कुरण विकासाच्या सर्वोच्च पातळीवर आहे. हे मारवेल व मोशी या दोन तृणजाती दाखवतात. मारवेल गवत हे उघड्या माळरानावर तसेच सागाच्या कोरड्या जंगलातील विरळ सावलीत दिसते.

मुसेल , मोशी - हे बहुवर्षीय गवत 15 ते 50 सें.मी.उंच वाढते. याची धावती मुळे 105 सें.मी.पर्यंत खोल जातात. पण त्यांचे बरेचसे कार्य 38 सें.मी.च्या पातळीवर चालते. हे गवत समुद्रसपाटीपासून 760 मीटर उंचीपर्यंत 500 ते 1375 मि.मी.पावसाच्या प्रदेशात आढळते. खोलगट जागी जिथे पाणी वर्षातील 2-4 महिने साठून राहते तिथे मोशी गवत उगवते. या गवताला मध्यम ते मऊ बारीक कण असलेली गाळाची माती मानवते. जमिनीचा सामू (झश्रीं) 6:1 ते 7:4 असावा. भारी काळ्या जमिनीवर पाणथळ जागी गवत आढळते. जमिनीत काही प्रमाणात क्षार असले तरी चालते. लागवड करण्याअगोदर जमीन चांगली नांगरून घेतात.

Animal food

हरळी, दूर्वा - हरळी याची खोडे जमिनीत आडवी पसरतात व त्यांना ठिकठिकाणी खालच्या बाजूने मुळे व वरच्या बाजूस पाने फुटतात.

Green grass

बन्सी - राजस्थानमध्ये 130 मि.मी.हून कमी पावसाच्या पण पाणी देण्याची सोय असलेल्या भागात वाढू शकते.

Animal Food Green grass

कुसळी - कुसळी गवताचे दोन प्रकार आहेत. वर्षायू प्रकारचे गवत आकाराने लहान असून हलक्या ते साधारण बर्‍यापैकी जमिनीवर वाढते.

Animal Food

लाल गवत, तांबरूट - हे वर्षायू, बुटके गवत कोरड्या आणि निमकोरड्या प्रदेशात आढळते. पण ती हिरवे गवत जास्त पसंत करतात.

Green grass

शिंपी - हे नाजूक वर्षायू गवत सुपीक जमिनीवर, बागायती पिकांध्ये तण म्हणून आढळते. याचा हिरवा चारा उत्कृष्ट समजला जातो.

Green Gass Animal Food

अंजन,धामण - हे वर्षायू किंवा बहुवर्षायू गवत नदीकाठच्या वाळूच्या जमिनीवर गुजरात व खानदेशात दिसते. हे गवत चार्‍याच्या दृष्टीने चांगले आहे.

Green Grass

दांड, डोंगरी गवत - हे गवत अतिवृष्टीच्या तसेच अल्पवृष्टीच्या प्रदेशात आढळते. शेताच्या बांधावर व डोंगर उतारावर याची बेटे होतात.

Animal Food

मुसेल , मोशी - या गवताला चांगली किंमत येत असल्याने भाताऐवजी शेतजमिनीवर लावतात. मुंबईच्या बाजारात चांगला भाव मिळतो.

Animal Food

मारवेल - पूर्ण वाढलेल्या गवताची उंची 1.2 मीटर पर्यंत असते. खोडे जांभळट लाल किंवा निळसर असून पेरांवर पांढरट केसांचे स्पष्ट वलय असते.

Green grass

हरळी, दूर्वा - हे गवत काटक व वसाहतवाले आहे. हे नवीन मोकळ्या जागी प‘थम लावता येते.जमीन व हवामानातील फरकांशी गवत जुळवून घेते.

Animal Food

बन्सी - याबाबतीत अंजन गवतापेक्षा हे जास्त चोखंदळ आहे.एकदा लावल्यानंतर तीन वर्षेपर्यंत गवताची चार्‍यासाठी कापणी करता येते.

Animal Food

कुसळी - ही गुरांना त्रासदायक व इजा करणारी असतात, म्हणून फुले येण्यापूर्वी गवत कापून गुरांना हिरवा चारा द्यावा किंवा त्यांना चरू द्यावे.