सुजाण नागरिक

Save food save life

अन्न फेकण्यापेक्षा एखाद्या उपाशी व्यक्तीच्या पोटात गेलेलं कधीही चांगलं.

Respect

विद्या विनयेन शोभते, विनम्रता जपुया मन जिंकूया.

Follow rules

एका रांगेत उभे राहण्याचा अर्थ असा नाही की आपण अनुयायी आहात हे आपल्या अहंकारापेक्षा अधिक मूल्य दर्शविते.

Follow rules

रांगेत परीक्षा असते संयमाची, सहनशक्तीची! रांग-संस्कुती अंगीकारा, रांगेची शिस्त पाळा!

Dont spit

मत्सर, अहंकार, द्वेष असं थुंकण्यासारखे बरेच काही आहे ते थुंका, पण रस्त्यावर थुंकू नका.

Be polite

गर्व आपल्याला अहंकारी बनवितो, मानवीयता वास्तविक बनवते. नम्र व्हा आणि छान व्हा.

Dont waste food

अन्नाची नासाडी टाळा. अर्थव्यवस्था बळकट करा.

Responsible citizen

बेजबाबदार नागरिकांचे मन, ‘कचरा’ करतांना जरा देखील ‘कचरत’ नाही. जबाबदार नागरिक होऊया, स्वच्छता पाळूया !

Take care of health

स्वतःच्या आरोग्यासोबतच स्वतःच्या गावाची व शहराची स्वच्छता करूया. स्वच्छता राखा. बाहेरच्या रोगांना दूर ठेवा.

Be polite

आपला दृष्टिकोन हा सामाजिक वर्तनावर प्रभाव टाकत असतो. दृष्टिकोन बद्दला वर्तन बदलेले

save food

अन्न त्यांच्याच ताटातून कचराकुंडीत जाते ज्यांना भूख काय आहे हे माहित नसते.

Use dustbin

ओला आणि सुका कचरा एकत्र टाळा. पर्यावरण स्वच्छ व हरित ठेवा.

Responsible citizen

रस्त्यातील नायलॉन मांजा उचलून बाजूला करा, जबाबदार नागरिक बना.

Dont spit

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने माझे आरोग्य धोक्यात येऊ शकते. थुंकू नका.

Dont spit

जिन्याचा वापर चढ उतारासाठी करा, थुंकण्यासाठी नाही.

Save food

अन्नाचा अपव्यय टाळा. जेवणाचा सदोपयोग करा.

Follow discpline

आपण रांगेत अनुसरण करता? होय मग आम्हाला तुमचा अभिमान आहे.

Save water

पाणी जपून वापरा – भरलेले पाणी फेकू नका, पाण्याचू नासाडी करू नका.

Follow Discpline

जसे तुम्ही शाळेतले दिवस आठवतात तसे शाळेतील शिस्त आठवा. रांगेची शिस्त पाळा.

Avoid sound pollution

हॉर्नचा वापर टाळा., ध्वनीप्रदूषणाला घाला आळा! ध्वनिप्रदूषण करु नका!

Save food

मुखी जाता अन्न चित्त राहे प्रसन्न अन्न हे पूर्णब्रम्ह आहे. अन्नाचा अपव्यय टाळा.

Global warming

कचऱ्याचे ढीग म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगला आमंत्रण ओला सुका कचरा वेगेवेगळा करा. पर्यावरणाचे संरक्षण करा

Dont split

सामायिक ठिकाणी थुंकू नका आणि तसे करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका

Food is precious

दोन वेळेचे जेवण हेच काही जणांसाठी अंतिम समाधान असते तेव्हा लागेल तितकेच अन्न ताटात घ्या.

Dont spit

पान खाऊन मारलेली पिचकारी रंगाचा बेरंग करते. थुंकण्याची सवय टाळूया, चला स्वच्छता पाळूया.

Follow rules

इवलीशी मुंगीसुद्धा रांगेची संस्कृती पाळते तर आपण का नाही रांगेची शिस्त पाळा.

Be polite

सुजाण नागरिकाचा विनम्रता हाच खरा दागिना विनम्रतेने वागूया, संस्कृती जपुया

Public property

सामायिक संपत्तीचे नुकसान म्हणजे केवळ अविचार वैचारिक विरोध मांडण्यासाठी घेऊ चर्चेचा आधार सामायिक संपत्ती जपुया बदल घडवूया.

Save food

उष्ट अन्न कुणालाच दिले जात नाही त्याची रवानगी थेट कचऱ्यातच होते अन्न वाया घालवू नका.

Follow discpline

रांगे मध्ये यावे, रांगे मध्ये राहावे रांगेस आपले म्हणता, रांगेचे नियम पाळावे

Clean city

शहराला कचऱ्याबरोबरच थुंकन्याने घाण स्वरूप प्राप्त होऊन रोगराई पसरते. थुंकू नका व थुंकू देऊ नका

Dont spit

स्वच्छतादूत बना पिचकारीबाज नको थुंकू नका व थुंकू देऊ नका.

Keep clean city

थुंकण्याची सवय सामाजिक अनारोग्यास कारणीभूत ठरते. थुंकण्याची सवय टाळू या. चला स्वच्छता पाळू या.

take care of health

गर्दीच्या ठिकाणो होळी खेळू नका. कोरडे व नैसर्गिक रंग वापरा. सणाचा आनंद घ्या पण आपल्या आरोग्याच्या काळजी घेऊनच.

Dont spit

संसर्गजन्य आजारांचा प्रसार हा थुंकण्यातून देखील होतो थुंकण्याची सवय टाळू या.

Save food

अन्न वाया घालवू नका. ते खूप अनमोल आहे.

धन्यवाद, माफ करा, कृपया. फक्त शब्दच नाही तर स्वतःच हे विधान आहे.आपण एक सभ्य हावभाव अनुकूल करूया, जी आपली खरी संस्कृती दर्शविते.

Follow queue

आपल्याला निश्चितपणे प्राधान्य मिळेल, आपण रांगेत असल्यास, फक्त रांगेचे अनुसरण करा.

Follow rules

नद्यांमध्ये दुषित पाणी सोडू नका पाण्याचे प्रदूषण करू नका !

Avoid air pollution

वायू प्रदूषण थांबवूया. मुलांच्या भविष्यासाठी काहीतरी करूया.

Help tourist

अतिथी देवो भव पर्यटकाना मदत करा, एक चांगला नागरिक व्हा.

Avoid sound pollution

उगा कशाला हॉर्न वाजवी... काना येईल बहिरेपणा... वृद्ध, बालक अन कुणी आजारी... फिकीर त्यांची करा जरा... !

Follow traffic rules.

रहदारी नियमांचे अनुसरण करा, रस्ता ओलांडण्यासाठी गरजूंना मदत करा

Clean city

तंबाखु-गुटका थुंकून आपल्या शहरात करू नका घाण स्वच्छतेने आपल्या स्मार्ट सिटीची वाढवू शान... !

Icon made by Freepik from www.flaticon.com