पाण्याला जीवन असे म्हटले जाते. म्हणजे पाणी जीवनासाठी आवश्यक असते, हा त्याचा एक अर्थ झाला. पिण्यासाठी आपल्याला पाणी लागते. शरीरशुद्धीसाठी, अंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी, भांडी धुण्यासाठी म्हणजेच अनेक नित्योपयोगी गोष्टींसाठी पाणी लागते. औद्योगिक क्षेत्रात पाण्याची आवश्यकता असते. ऊर्जानिर्मितीसाठी, मग ती जलऊर्जा असो किंवा औष्णिक वा अणुऊर्जा, त्यासाठी पाणी हेच माध्यम असते. शेती क्षेत्रात तर पाण्याची गरज फार मोठी असते.
पाण्याची आवश्यकता अशी सर्वच क्षेत्रांत जाणवत असताना त्या पाण्याविषयी प्रत्येकाच्या मनात कुतूहल असणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. तरीदेखील पाण्याविषयी शास्त्रीय माहिती समाजात अभावानेच आढळते. कोलंबसने जहाजावर अनेक दिवस सतत प्रवास करीत असताना म्हटले होते की, ‘‘सगळीकडे पाणीच पाणी आहे, पण पिण्यासाठी मात्र एकही थेंब नाही!’’
पाणी एक थेंब एखाद्या तहानलेल्या व्यक्तीसाठी जीवन आहे.
गरजेपुरतेच पाणी पिण्यासाठी ग्लासमध्ये घ्या.
नेहमी नळ काम झाल्यावर बंद करा.
फक्त वाळवंटात चाला, आपल्याला पाण्याचे महत्त्व लक्षात येईल.
पाण्याच्या स्वच्छेते विषयी दक्षता घेव़ू,सर्व रोगराईना दूर पळवू.
एक छिद्र अनेक थेंब नष्ट करू शकते.
पाणी मौल्यवान आहे पण त्याची उपलब्धता गंभीर आहे.
पाण्याविना नाही प्राण, पाण्याचे तू महत्व जाण.
पाणी नाही द्रव्य,आहे ते अमृततुल्य.
पाणी म्हणजे जीवन, हेच आपले स्पंदन.
पिण्याचे पाणी घ्या ओगराळ्याणे, दूषित करू नका तुमच्या हाताने.