माझ्या स्वप्नातील समृद्ध गावाची सुरुवात पक्ष्यांच्या किलबिलाट व चिवचिवटाबरोबर तर कधी कोंबड्याच्या बांगेने व्हावी. गावाच्या बाजूला असलेले हिरवेगार डोंगर असावीत, जिथे सुट्टीच्या दिवशी मला फिरायला जायला आवडेल. गावातून शेतात जाण्यासाठी बैलगाडीची सैर करायला मनापासून आवडेल.तसेच गावच्या वनराईतील ऋतूनुसार मिळणाऱ्या रानमेव्याची म्हणजेच पेरू, आंबा, चिंच, बोर आणि जांभूळ यांची गोडी चाखायला आवडेल.
निंबाच्या किंवा आंब्याच्या झाडाला बांधलेल्या झोक्यावर उंच झोका घ्यायला आवडेल. गावातल्या नदीकाठी किंवा असणार्या तळ्याकाठी मासे, पानकोंबडी बघायला आवडेल. माझ्या स्वप्नातील गाव हे स्वच्छ, सुंदर व सौरउर्जेने युक्त असावे. भारतातले प्रत्येक गाव हे समृद्ध गाव असावे. तिथे लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वाना लागणाऱ्या सर्व जीवनावश्यक गोष्टी असाव्यात. जसे कि,-