महाराष्ट्रातील प्रत्येक गाव समृद्ध असावे. त्या दृष्टीने उचललेले एक पाऊल म्हणजेच माझे स्वप्नातील गाव हे संकेतस्थळ. काही कर्तव्य, काही चांगल्या सवयी यांच्या माध्यमातून आणि सर्वांच्या सहकार्याने गाव समृद्ध होऊ शकते. समृद्धता येण्यासाठी निसर्गाची, पर्यावरणाची घ्यायची काळजी आणि त्यातून घडून येणारा विकास यांचा समतोल साधून आनंदी जीवनशैलीची मुहूर्तमेढ करण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजेच माझे स्वप्नातील गाव. संकेतस्थळांवरील सामाजिक संदेश हे चांगले बदल घडण्याच्या दृष्टीने आहेत. हे जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचल्याने एक चांगला सामाजिक बदल होऊ शकतो. त्यासाठी आपला अभिप्राय व सहकार्याची नेहमीच गरज असेन.google forms च्या सहाय्याने आपला अभिप्राय जरूर कळवावा.